Shri. Charudatta (CM) Thorat AbhangaGatha


*|| दत्ताश्रय अभंगगाथा ||*

मुखाचीं सुंदरता न येतसें कामीं |
मुखींचे शब्द दाखवे | मणुष्याचे चरितः ||१||
अर्थ :- मुखाच्या सुंदरतेने व्यक्तीचे चरित्र ज्ञात होत नसते,
तर व्यक्तीच्या मुखातील शब्दाने ज्ञात होते !

नसावां तो साधू कधीं | ज्यासीं साधूत्व प्राप्तलें कूळार्थाने |
त्यासची पूजावे सदा ज्याने मेळविले सप्रयत्नेंः || २ ||
अर्थ :- साधूत्व हे साधूला कधीही वडिलोपार्जित प्राप्त होऊ
शकत नाही, तर प्रयत्न तथा मेहनतीनेचं ते खर्यार्थाने प्राप्त
करता येते.

चारू म्हणे जैसीं जयाचीं आण दृष्टी |
तीं करीं निर्मीत तैसेचीं सृष्टीः || ३ |||
गूढार्थ :- म्हणून, ह्या ज्ञानबोधाला जो ज्यार्थाने ग्रहण करीलं,
त्यार्थाच्या सृष्टीची रचना आपोआप साधकाकडूनचं केलीं जाईंल.

(गुरूवर्य) - श्री विष्णुभक्त चारूदत्त
Teacher - Shri. VishnuBhakta Charudatta

ब्रीद :- *व्यसनमुक्त समाज हाचं आमचा जीवनध्यास*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Bal Sanskar Yoga School - Guruji Shri. Charudatta Thorat (Photos)

कम्युनीटी रेडिओ नाशिक - हरी कुलकर्णी - चारूदत्त थोरात