|| मतदानोत्सवम् - विष्णुभक्त चारूदत्त ||
मतदान केवळ न कर्तव्य,
हक्कही जाणा आपुला !
*मतदानोत्सव* कराया साजरा
मतदारांनो चला चला ||
एक मताची किंमत अनमोल,
सुयोग्य शासक बसवायला !
*मतदानोत्सव* कराया साजरा
मतदारांंनो चला चला ||
अधिकार लोकशाहीचा हा
उन्नतीर्थ बजवायला !
*मतदानोत्सव* कराया साजरा
मतदारांंनो चला चला |||
*मतदान* हा मतदाराचा केवळ हक्कचं नाही, तर लोकशाहीतील महत्त्वाचे कर्तव्यदेखिल आहे. *मतदारराजा* च्या मताची किंमत अनमोल आहे, जी देशामध्ये सुशासक निर्माण करण्यांस प्रभावी भूमिका बजावते. भारतीय लोकशाहीने दिलेला हा अनमोल "मताधिकार" प्रत्येक भारतीय नागरिकाने बजावयास हवा. हा लोकतंत्राचा अविभाज्य सोहळा, अर्थात् *मतादानोत्सव* आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Comment Your ideas !