: पाठ नाम :
|| अभक्त दर्शनम्  ||

नाही ज्यासीं संगती शुद्धतेची सर्वथा |
आणीक पाहीं तो सदैव ना-ना व्यथाः || १ ||
ज्याने "शुद्ध संग" नामक सभेचा स्विकार केला नाही,
अशा जागृतीरहित साधकाने अभक्तीचाचं
स्विकार केला आहे.

ध्यानता लोचन एकचित्त पूर्ण | एकत्व नारायण |
इह नाही ज्यांसीं आण | तो अभक्तीक जाण || २ ||
ज्याने "एकचित्त" नामक
ध्यानबीजभाव धारण केला नाही,
त्याला "एकत्व" नारायणरुपी मूळबीज साध्य झाले नाहीं,
अर्थात्, अभक्त हा ह्या गूढयोगत्वापासून कायमचं वंचित राहतो.

परमानंदु परम् योगीकेची प्राप्ती |
परि भोगातीत अभक्ताची विकृतीः || ३ ||
योगप्राप्तीर्थ "योगत्व" प्राप्तशील साधक हा सदैव
योगातीत-आपकर्मामधून "परमानंद" साध्य करतो.परंतु,
भोगप्राप्तीर्थ "भोगत्व" प्राप्तशील "अभक्त" हा सदैव
भोगातीत-प्रत्येक एका कर्मातून विकृतीचीचं प्राप्ती करतो!

 दत्ताश्रयानीज अभक्तीक गुण वदलें |
साधकु साध्यार्थे | परमाकारणेंचियेः || ४ ||
"परम् साध्याच्या प्राप्तीर्थ मार्गात
येणार्या अनेक आसक्तीवर्ध अडथळ्यांपासून रक्षिण्या कारणें
 हा "अभक्त दर्शन" पाठ साधकांस अर्पण केला आहे,
असे दत्ताश्रय सांगतात."

- महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्तः महेशरावः थोरातः

Tags :  Shri. VishnuBhakta Charudatta, Charudatta Thorat, महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्तः, काव्य विष्णु सदन 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Bal Sanskar Yoga School - Guruji Shri. Charudatta Thorat (Photos)

कम्युनीटी रेडिओ नाशिक - हरी कुलकर्णी - चारूदत्त थोरात