|| "होळी-धुलिवंदन" विशेष भाग ||

_____________________________________________

* विष्णुभक्त चारूदत्त अभंगगाथा प्रकार :
गुप्तज्ञान दत्ताश्रयी मराठी भक्तीपर अखंडज्ञानयोग संबंधित गोवी
------------------------------------------------------------------------------
* आजचा अभंग :
: पाठ नाम :
|| होलीका दहन योगम् ||
_____
होलीका दहनाध्याय |
दृष्टीदर्शन स्वाध्याय ||१||
"होलीका दहन"
योगीक दर्शनाचे अभूतपूर्व  पर्व आहे.
जे साधकाला स्वाध्याय मार्गाने
जागृतीदाय, अनुभूतीदाय ठरते.
_______
होलीका दहनांतर्य |
व्याधीर्दहन होयः ||२||
योगीक "होलीका" ज्यामध्ये साधक
आपल्यातील दोष-गुणांचे दहन  करतो.
साधनेच्या पूर्णत्वाला साध्य करतो.
अर्थात्, "व्याधी-दहन" ही क्रीया पार पाडतो.
_______
प्रल्हादु परम् पूर्णाविनाशी |
हरि हा #सुंदर तयाचें पाशी || ३ ||
होलीका #मायावी असूनही
तिला प्रल्हादाचे दहन करता आले नाही.
प्रल्हादाची #निष्काम#निस्वार्थ #गुरुभक्ती
या प्रभावाने होलीकेचेचं दहन झाले.
________
तैसी गुरूभक्ती श्रेष्ठोत्तर सदैव |
#चारू हृदयवसीत श्रीविष्णुदेवः ||४|||
साधकाने सदैव गुरूंविषयी आदर ठेवावा तथापि
एवढेचं पुरेसे नसुन त्यांचे आचरणही आवश्यकचं
आहे. मनातील, शरिरातील वाईट किंवा व्यर्थ
वासनाशील कींवा कपटी स्वभाव आपल्यातून जाळून
टाकून त्यांचे कायमचे दहन करणे अपेक्षित आहे,
अशी दत्ताश्रयांची #व्याख्या यात वर्णीली आहे.
________
इति होलीका दहन योगम् |
समाप्तः |||
_________
 - गुरूवर्य श्रीविष्णुभक्त चारूदत्त -
____________________________________________

*स्थळ : काव्य विष्णु सदन, नाशिक. (महाराष्ट्र राज्य)*
_____________________________________________

Email : balsanskaryogaschool@gmail.com
_____________________________________________

shri. Charudatta (CM) Thorat , NASHIK. (MAHARASTRA)



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कम्युनीटी रेडिओ नाशिक - हरी कुलकर्णी - चारूदत्त थोरात