Letest Video 
.
|| बाल संस्कार योग अभंग क्र.२० ||
|| Bal Sanskar Yoga Abhanga no.20 ||
.
देह नश्वर केवळ | देह नश्वराचे घर |
तेणें देखावे सर्वदा | योगीयाचें समः || १ ||
व्यर्थ दृष्टी लेता | देहबोधाची जागृतीः |
जिचें ठायीं न केलीं | कधीं परम् वृत्तीः || २ ||
देहासीं जाणोनी नश्वरतुल्य सदाः |
चारु म्हणें तियांतर | शोधें पांडूरंगू चिदाः || ३ |||
.
.
- योगार्थ -

"देह अर्थात् शरिर...
 म्हणजे अंतरात्म्य उर्जेचे ते  एक वस्त्र स्वरुपचं !
देहनिष्ठ बोधाला देहबोध असे म्हणतात.
शारिरीक वासना, कामनांमध्ये ज्याचें चित्त गुरफटून 
आहे, अशा व्यक्ती किंवा जीवात्म्याला ह्या बोधाची 
लागण किंवा प्राप्ती होते.
देहनिष्ठ बोध धारण केलेल्या मनाला 
कधीही योगीक अवस्था साध्य होत नाही.
थोडाक्यात्, 
बाह्य शरिर हे केवळ आंतरिक परमात्म्याचाचं 
एक अंश आहे.. 
शरिर हे नश्वर असून त्याचा आत्यंतिक मोह 
हा दुःखाचेचं कारण असेल!
म्हणून, साधकानें सदैव साधनातीत अवस्थेत
देहबोधाचां त्याग वैराग्य धारण करूनचं करावा,
असे दत्ताश्रय सांगतात."
......

+ || ज्योती सुविचारम् ||

मणुष्याने फक्त
 लक्ष्मीची पूजा केली म्हणजेचं
लक्ष्मी प्रसन्न होत नाही तर त्याजोडीने 
आपले सात्त्विक नियमित कर्म, दान, धर्म 
यांचीही आवश्यकता असते.
- आईसाहेब सौ.ज्योती (आई) महेशराव थोरात.
.
.
|| चारूदत्ताश्रय क्रीया अखंडज्ञानयोग ट्रस्ट ||
.
काव्य विष्णु सदन प्रतिष्ठान, नाशिक. (महाराष्ट्र)
___________
|| बाल संस्कार योग शाळा ||
Bal SanaSkar Yoga School 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कम्युनीटी रेडिओ नाशिक - हरी कुलकर्णी - चारूदत्त थोरात