(भारत) स्वदेशासाठी झटणार्या, शहिद होणार्या प्रत्येक सैनिकासाठी हे "योगत्त्व-ज्ञानयोग" समर्पित आहे..
|| बाल संस्कार योग शाळा अभंग क्र. १९ ||
स्वदेशार्थ जयाचे प्राण जाहले विलीन |
त्यापरि न कुणी जाणावा महान || १ ||
स्वदेशार्थ जयाचें सांडिले रक्त |
तोची पुरुषें देखावा खरा देशभक्त || २ ||
चारू म्हणे जाणा योगीया समान |
आपुला जवान | "भारत-भूई"चिया || ३ |||
दत्ताश्रय अर्थ :
"ज्याप्रमाणे साधक-योगी हा नित्य आपल्या
परमपित्याच्या साधनेत सदैव व्यस्त असतो.
तहान-भूक, लोभ, मोहादिंना भूलून तो
सदैव परमेकचिंतनात एकरूप असतो.
योगीयांची आपल्या साध्याप्रदची अखंडेकनिष्ठा,
आणि शिस्तबद्ध नित्यक्रमता यामुळे त्याला
"योगीकत्व" साध्य होत असते..
अगदी त्याचयोगें, देशाची निष्काम सेवा करणारा
"देशभक्त" आपल्यातील अखंडदेशप्रेमाच्या
परम् व्रतामुळे योगीया समानचं पूजनीय बनतो.
त्याची प्रत्येक एक दिनचर्या ही योगीयापरिचं
निर्मोही, शिस्तबद्ध अशा स्वरूपाची असते.
स्वदेशसेवा हि परमेश्वर सेवेच्याचं तुल्यबळं असते.
त्यामुळे, स्वदेशार्थ मरणं पावलेला प्रत्येक जवान
हा संतांच्याचं तुल्यबळं आहे.. व त्याचे पार्थीव
संतांच्या समाधी इतकेचं श्रेष्ठ आहे,
असे दत्ताश्रय सांगतात."
.
.
.
बाल संस्कार योग शाळा,
संस्थापक अध्यक्ष : श्री चारुदत्त महेशराव थोरात.
_
Bal Sanskar Yoga School,
Founder President : sri. Charudatta Thorat
_
स्थळ - काव्य विष्णु सदन, नाशिक. (महाराष्ट्र)
_ Kavya Vishnu Sadan, Nashik. (MAHARASHTRA)
_
_ ॐ शांतृs
Charudatta Thorat's spiritual Truthtual knowledge of Dattasraya...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Comment Your ideas !